Oyos Travelpedia-2024 Report: फिरणं हा सर्वांच्याच आवडीचा छंद असतो. आपल्या धक्काधकीच्या जीवनातून वेळ काढून प्रत्येकजण फिरण्यासाठी वेळ काढतोच. फिरल्यामुळे डोक्यावरील ताण कमी होऊन आपल्याला फ्रेश वाटतं. नव्या कल्पना सुचतात, नवी माणसं भेटतात, नवी ठिकाणं ओळखीची होतात, त्यामुळे फिरायला जाण्याचा सल्ला सर्वजण आपल्याला देतात. भारतात तर अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना तुम्ही भेट द्यायला हवी. ही ठिकाणं पाहण्यासाठी जगभरातील लोकं इथे येतात. 2024 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक कोणत्या ठिकाणांना भेट दिली असेल? कधी विचार केलाय का?
यावर्षी (२०२४) पुरी, वाराणसी आणि हरिद्वार ही सर्वाधिक भेट देण्यात आलेली आध्यात्मिक स्थळे आहेत. तर हैदराबादमध्ये सर्वाधिक बुकिंग नोंदवण्यात आले आहेत. मंगळवारी ओयोचा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ट्रॅव्हल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म ओयोच्या ‘Travelpedia-2024’ चा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये भारतीयांच्या प्रवासाचे नमुने आणि ट्रेंडची सखोल चर्चा करण्यात आली आहे. 2024 या वर्षात ओयोमध्ये किती बुकींग झाल्या या निष्कर्षाच्या आधारे हा डेटा तयार करण्यात आला आहे.
यावर्षी भारतात धार्मिक पर्यटनावर विशेष भर देण्यात आला असून त्यात पुरी, वाराणसी आणि हरिद्वार या शहरांसाठी सर्वाधिक बुकिंग नोंदवण्यात आले आहे. यासोबतच देवघर, पलानी आणि गोवर्धनमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली. ओयोच्या अहवालानुसार, हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता ही शहरे बुकिंगच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत तर उत्तर प्रदेशने प्रवासासाठी सर्वात लोकप्रिय राज्य म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.
प्रवासाच्या बाबतीत महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक हे प्रमुख योगदानकर्ते आहेत. पाटणा, राजमुंद्री आणि हुबळी सारख्या लहान शहरांसाठी, बुकिंगमध्ये वार्षिक आधारावर 48 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
'या वर्षी सुट्टीतील प्रवासाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसली. जयपूर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. त्यानंतर गोवा, पुद्दुचेरी आणि म्हैसूरसारखी बारमाही आवडती ठिकाणे आहेत, अशी माहिती ओयोच्या अहवालातून देण्यात आली आहे. या सर्व शहरांच्या तुलनेत मुंबईत बुकिंगमध्ये घट दिसून आली.
'2024 हे जागतिक प्रवासाच्या लँडस्केपमध्ये बदलाचे वर्ष ठरले आहे. प्रवासी व्यवसाय किंवा विश्रांतीसाठी लवचिकता आणि अनुकूलता kms स्वीकारतायत हे आम्ही पाहिल्याचे ओयोचे ग्लोबल चीफ सर्व्हिसेस ऑफिसर श्रीरंग गोडबोले म्हणाले.