Pankaja Munde on PM : मनातील मुख्यमंत्रीनंतर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे पंतप्रधानांबाबत (Prime Minister) मोठे वक्तव्य समोर आले आहे. देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली, तुमची ताई होऊ शकत नाही का? भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. परळी मतदारसंघात 'जल जीवन मिशन' कामाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.
याआधी पंकजा मुंडे यांनी असेच वक्तव्य केले होते. जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री आहे, असे वक्तव्य पंकजाताई यांनी केले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारात त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केले होते. याची जोरदार चर्चा होती. मात्र, पंकजा मुंडे या बीड परळीमधून पराभूत झाल्यात. त्यानंतर त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. त्या भाजपला सोडणार अशीही चर्चा होती. दरम्यान, त्यांना पुन्हा भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली. आता पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान पदाचे स्वप्त पाहिले आहे. त्यांनी तसे बीडमधील एका कार्यक्रमात बोलून दाखवले आहे. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा आहे.
देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली. तुमची लेक होवू शकत नाहीं का? अस वक्तव्य भाजप पंकजा मुंडे यांनी केले आहे. परळी मतदारसंघात एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्त्री विकास करु शकत नाहीं का? जेवढं पुरुषांनी दिले नाहीं तेव्हढे मी दिले आहे. देशाची प्रधानमंत्री होऊ शकत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, याआधी त्यांनी जाती-धर्माच्या राजकारणावर प्रहार केला होता. हनुमान चालीसा कुठे म्हणायच यावरुन राजकारण कशासाठी, कुठल्या अभिनेत्रीनं कोणतं वस्त्रं घातलं यावरुन राजकारण का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्यावेळी याची चर्चा झाली.
पराभवामुळे जो वेळ मिळाला त्यामध्ये शिकायला मिळाले आहे. राष्ट्रीय राज्यकारणामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याम्हणाल्या, गोपीनाथ मुंडे दोन दिवस एकदा घरातून गेले की प्रचार करायचे. लोकांना एकत्र करत गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाढवला. आमदारांना निधी मिळाला मात्र मी माजी आमदार मलाही निधी नाही मिळाला. जे आमदार पडले त्यांनी जे शब्द दिले ते पाळायचे नाहीत का? राजकारण रंगाचं करु नका विचार आणि विश्वासाचा राजकारण करा असं मोदीजी म्हणतात तसं राजकारण करायला हवे. संत महंत देवधर्म याच्यावर राजकारण करण हे आम्हाला कदापि मान्य नाही, असे त्या म्हणाल्या.