प्रवण पोळेकर, झी मीडिया: सध्या आपल्याकडे महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच पद्धतीनं पुढे सरकते आहे. सध्या शिंदे - फडणवीस (Maharashtra Politics) सरकारची आमदारांवरून कोर्टाची सुनावणी सुरू झाली आहे त्यामुळे सध्या सगळीकडे वेगळेच वातावरण सुरू झाले. त्यातून सध्या शरद पवार (Sharad Pawar) हे रूग्णालयात दाखल जाले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या या भेटीवरून सगळीकडेच चर्चेला उधाण आलं होतं. शरद पवार हे देशाचे नेते आहेत त्यांना भेटण्यात गैर काय? या भेटीतून अनेकांनी बोध घ्यावा तसेच शरद पवार - एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीत महाराष्ट्राची (Political Update) संस्कृती दिसून आली असे उद्गार यावेळी उदय सामंतांनी (Uday Samant) एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीवर टिप्पणी केली आहे. (political leader uday samant speaks on eknath shinde and sharad pawar meet)
निवडणुकीत ज्यांचा स्वतःचाच पराभव झाला त्यांनी काही बोलू नये. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत बोलावं; एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पडणार या चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर उदय सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे; फडणवीस पंढरपूर (Pandharpur) येथे काय बोलले त्यातून त्यातून सरकार बद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी शिंदे फडणवीस सरकार पडणार केलेल्या विधानावर सामंतांनी आपले रोथठोक मतप्रदर्शन केले.
रिफायनरीची लढाई भारत - पाकिस्तान बॉर्डरची नाही; रिफायनरीचे विरोधक माझ्याच कुटुंबातील आहेत आणि त्यांच्याशी मी चर्चा करणार, असेही सामंत यांनी सांगितले. आपल्यातले बारा आमदार शिंदे - फडणवीस सरकारमध्ये जाऊ नयेत म्हणून अमोल मिटकरी शिंदे - फडणवीस सरकारमधले बारा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान करतात, अशी माहितीही सामंतांनी दिली.
चांगलं केलं तर मी केलं वाईट झालं तर शिंदे फडणवीस सरकारमुळे झालं, अशी प्रवृत्ती सध्या महाराष्ट्रभर आहे, असं उदय सामंतांनी आपलं मतं मांडलं. आदित्य ठाकरे यांच्यावरती मी कधीही टीका केली नाही. त्यांच्यावर टीका करण्याचा मला अधिकार नाही, असे उद्गारही सामंतांनी काढले. इडी, सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यांना काय करायचं त्या ते ठरवतात. मंत्री म्हणून मी यावरती बोलणं योग्य नाही. नवाब मलिक यांची संपत्तीने जप्त केल्यावर पत्रकारांनी सामंत यांची प्रतिक्रिया विचारली.