जगात भारी कोल्हापूरी; इंजिनियर तरुणाच्या 'त्या' फोटोला 'Apple Award'

कोल्हापूरच्या एका तरुण इंजिनियरने आपलं नाव जागतिक स्पर्धेत उंचावलं आहे. 

Updated: Apr 14, 2022, 04:18 PM IST
जगात भारी कोल्हापूरी; इंजिनियर तरुणाच्या 'त्या' फोटोला 'Apple Award' title=

मुंबई : कोल्हापूरच्या एका तरुण इंजिनियरने आपलं नाव जागतिक स्पर्धेत उंचावलं आहे. ऍपल कंपनीने 'शॉट ऑन आयफोन' ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती. कोल्हापूरच्या प्रज्वल चौघुले यांचा या स्पर्धेत टॉप टेनमध्ये सामावेश झाला आहे. चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिका या देशांतील इतर नऊ विजेत्यांमध्ये प्रज्वल चौगुलेच्या नावाचाही समावेश झाला आहे प्रज्वल यांच्या 'त्या' फोटोची जगभरात चर्चा आहे. त्यांनी कोळ्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदूचा फोटो काढला आहे.

प्रज्वल यांना एका ठिकाणी कोळ्याच्या जाळ्यावर दवबिंदू पडल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या आयफोन 13 प्रो मध्ये तो फोटो टिपला.  हा फोटो निसर्गाचं एक विशेष रुप दाखवतो. प्रज्वल यांना नैसर्गिक फोटो टिपायलं आवडतं. निसर्गात रमायला आवडतं, असं ते म्हणतात.

ऍपल कंपनीने 'शॉट ऑन आयफोन' ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती. 25 जानेवारी 2022 रोजी या फोटोग्राफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.  या स्पर्धेत प्रज्वल यांच्या फोटोला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळालं आहे.

हे फोटो ऍपलच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आले होते.