मुंबई : पुणे जिल्ह्यातील बारामती शेजारी माळरानावर परदेशी पक्ष्यांचे आगमन झालेय. 'भोरड्या' हे स्थलांतरित पक्षी युरोपातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येतात. आजही हे पक्षा दाखल झालेत. त्यांच्या मनमोहक कवायती डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.
पाणलोट क्षेत्रामध्ये भोरड्यांच्या कवायतीमुळे संध्याकाळ मनमोहक झालेय. भोरड्यांचे मनोहारी नृत्याविष्कार डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.सूर्यास्तावेळी ते आकाशात असे सुंदर नृत्य करतात. त्याचा हा व्हिडीओ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
बारामती शेजारी माळरानावर 'भोरड्या' हे स्थलांतरित पक्षी युरोपातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येतात.
सूर्यास्तावेळी ते आकाशात असे सुंदर नृत्य करतात. त्याचा हा व्हिडीओ.. pic.twitter.com/luJ67mtmDr— Supriya Sule (@supriya_sule) March 10, 2018