मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले

Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 14, 2024, 12:30 PM IST
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले title=
property prices rise due to mthl mumbai trans harbour link flats become costlier in ulwe and dronagiri

Mumbai Trans Harbour Link Toll: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे उद्घाटन केले. भारतातील सर्वात लांब सागरी सेतूमुळं मुंबईसाठी चमत्कारच मानला जात आहे. या पुलामुळं दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. पुलाचे उद्घाटन होताच या परिसरातील जागेचे भाव वाढले आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकजवळच्या परिसरातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. 

नवी मुंबई विमानतळालगत असलेल्या उलवे नोडच्या प्रॉपर्टीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सहा महिन्यात 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर उल्वेलगत असलेल्या द्रोणागिरी आणि चिर्ले परिसरातील जागेच्या किंमतीही वाढल्या आहेत. एमटीएचएल उल्वे ते मुंबईच्या शिवडीला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळं नवी मुंबई ते मुंबईचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. 

नवी मुंबई परिसरात गेल्या तीन वर्षांत प्रोपर्टीच्या किंमतीत जवळपास 35 टक्के वाढ झाली आहे. द्रोणागिरी आणि चिर्लेमध्येही 10 ते 15 टक्क्यांनी महागाई वाढली आहे. उल्वेमध्ये फ्लॅटची किंमत 10 ते 15 हजार रुपये प्रति स्क्वेअर फुटपर्यंत पोहोचली आहे. 2021मध्ये याच भागात प्रति स्क्वेअर 6 ते 8 हजार रुपये इतका भाव होता. 

एमटीएचएलमुळं गेल्या 6 महिन्यात उल्वेमध्ये प्रॉपर्टीच्या किंमतीत वाढ झाली आहे. द्रोणागिरी आणि चिर्लेमध्येही किमती वाढल्या आहेत. मात्र, इथल्या रहिवाशांना पब्लिक ट्रान्सपोर्टची कमतरता जाणवते. एक-एक तासांने लोकल असल्याने लोकांना जबरदस्ती बस किंवा रिक्षाने जावे लागते. तर, रिक्षाचालक मीटरने भाडे घेत नाहीत तर त्याच्या मनाप्रमाणे भाडे घेतात. तसंच, उल्वे नोडवर पेट्रोल पंपादेखील खूप कमी आहेत. नागरिकांना सीएनजीसाठी बेलापूर किंवा द्रोणागिरीला जावे लागते. या समस्या असतानाही उल्वेमध्ये प्रॉपर्टीच्या दरात वाढ होत आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उलवे नोड दरम्यान बांधण्यात येत असलेल्या जिओ युनिव्हर्सिटीमुळेही हे आवडते ठिकाण बनत आहे. गेल्या तीन वर्षांत येथील फ्लॅटच्या किमती सुमारे 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. खारकोपर आणि बामणडोंगरीमुळे उलवेमध्येही मालमत्तांच्या दरात तेजी आहे. जेएनपीटीसाठी उलवे नोडला प्राधान्य देण्यात येत आहे.