Pune Rain : मुसळधार पावसानं पुणे शहराला झोडपलं, अनेक भागात पाणीच पाणी... पाहा Video

पुण्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, रस्त्यांच्या कडेला पार्किंग केलेली अनेक वाहनं वाहून गेली

Updated: Sep 11, 2022, 08:12 PM IST
Pune Rain : मुसळधार पावसानं पुणे शहराला झोडपलं, अनेक भागात पाणीच पाणी... पाहा Video

Pune Rain : पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झालाय. पुणे आळंदी रस्त्यावरच्या दिघीमध्ये ढगफुटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं. पाण्याचा प्रवाह एवढा होता की पूर आल्याचं दृश्य दिसत होतं. रस्त्याच्या कडेला पार्कींग केलेली बरीच वाहनं यामध्ये वाहून गेली. तर अनेक वाहनांचं नुकसान झालं.  

पुण्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. संध्याकाळी साडे चारच्या सुमाराला अचानक अंधारून येऊन जबदरस्त पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी जमा झालं आणि वाहतूक कोंडी झाली. या पावसाने पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. तर पौड परिसरातही तुफान पाऊस झाला... यावेळी रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं आणि नाल्याचं स्वरुप आलं. 

पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. पौड परिसरात दुपारी झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या नाल्याच स्वरूप आलं होतं. अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी शिरलय.