पुणेरी पगडी आणि पवारांचे ते कॉलेजचे खुमासदार किस्से

आपल्या कार्यक्रमात पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी चढवून पाहुण्यांचा सन्मान व्हावा अशा सूचना पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात केल्या होत्या.

Updated: Dec 17, 2019, 03:49 PM IST
पुणेरी पगडी आणि पवारांचे ते कॉलेजचे खुमासदार किस्से title=

पुणे : आपल्या कार्यक्रमात पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी चढवून पाहुण्यांचा सन्मान व्हावा अशा सूचना पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात केल्या होत्या, तेंव्हापासून त्यांच्या डोक्यावर कधी पुणेरी पगडी दिसली नाही, मात्र सोमवारी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात पवारांना पुणेरी पगडी चढवण्यात आली.

अर्थात पवारांनी अवघ्या काही सेकंदांत ही पगडी डोक्यावरन उतरवली, असं असलं तरी शरद पवारांच्या डोक्यावर पुणेरी पगडी पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी भाषणात पवारांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतले काही खुमासदार किस्से सांगितले.