नाशिक : नाशिकमध्ये चोरीच्या संशयावरून दुकान मालकाने केलेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. राहुल जाधव असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. विनायक ट्रेडर्स या दुकानाच्या मालकाने केलेल्या हाणामारीत बत्तीस वर्षीय राहुलचा मृत्यू झाला आहे. राहुल मूळचा धुळे येथील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी होता. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.
अंबड पोलीस ठाण्यात दुकान मालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.