Raigad News Today: रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील घटना आहे. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला होता.
कोकण रेल्वे खाली उडी मारून माणगावच्या गोरेगाव येथील महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या केली आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस खाली उडी मारून महिलेने मुलीसह आपले जीवन संपवले. दोघींचेही मृतदेह हाती लागले आहेत.
दरम्यान, महिलेने आत्महत्यापूर्वी आपल्या मैत्रिणीला व्हॉइसमेसेज पाठवला होता. त्यात तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून दोन्ही मुलींसह आत्महत्या करत असल्याचे म्हटलं होते. त्यानंतर मैत्रिणीने लगेचच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली मात्र तिथे महिलेचा व तिच्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला. मात्र, दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांकडून व स्थानिकांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये.