आताची मोठी बातमी! रायगडच्या समुद्रकिनाऱ्यात संशयास्पद बोट, बोटीत AK-47 सह शस्त्रास्त्र

रायगड जिल्ह्यात हायअलर्ट, संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी

Updated: Aug 18, 2022, 02:29 PM IST
आताची मोठी बातमी! रायगडच्या समुद्रकिनाऱ्यात संशयास्पद बोट, बोटीत AK-47 सह शस्त्रास्त्र title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगड जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यात संशयास्पद बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीत शस्त्र सापडल्याची माहिती समोर आली असून बोटीत 4 एके 47 सापडल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. पण पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण रायगड जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जत आहे. 

नेमकी घटना काय?
सकाळच्या सुमारास हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ एस संशयास्पद बोट आढळून आली होती. सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छिमारांची असल्याचं लोकांना वाटलं, पण या बोटीत शस्त्रास्त्र आढळल्याने एकच खळबळ उडाली.

1992 - 93 मुंबई बॉम्बस्फोटात जे आरडीएक्स वापरण्यात आलं होतं, ते सुद्धा रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरवण्यात आलं होतं, आता पुन्हा एकदा संशयास्पद बोटीत शस्त्रास्त्र सापडली आहेत, त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात हायअलर्ट देण्यात आला आहे.