मुंबई : Raj Thackeray Pune Sabha : मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. (Raj Thackeray On Ayodhya tour) हा सगळा सापळा हे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मला अयोध्येला येऊ देणार नाही, अशा वल्गना काही जण करत होते. मला अनेकांकडून माहिती मिळत होती. अगदी मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश....पण हा सगळा ट्रॅप होता. आपण या ट्रॅपमध्ये आपण फसायला नको हे माझ्या वेळीच लक्षात आले म्हणून मी माझ्या दौरा स्थगित केला आहे, असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, यातून चुकीचे पायंडा पडत आहेत, गुजरातमधून कोणाला माफी मागायला लावणार आहात ते सांगा. जर मी हट्टाने गेलो असतो, तर माझ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले असते, मग ऐन निवडणुकीवेळी त्या केसेस चालवल्या असता आणि इथे कोणी नसतं, हा सर्व ट्रॅप होता, मी जात नाही म्हटल्यावर शिव्या खायला तयार आहे पण पोरांना अडकू देणार नाही. शिव्या खायला तयार आहे पण पोरांना अडकू देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. अयोध्येला दौरा खुपणाऱ्यांनी रसद पुरवली गेली. उत्तर भारतीयांचा विषय बाहेर काढा. राजकारणात भावना समजत नाही. एक खासदार उठतो, तो मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. माझी ताकद हकनाक गेली असती. त्यांना मी हकनाक जाऊ देणार नाही. त्यामुळे माझ्यावर टीका झाली तरी काहीही हरकत नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीला राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेता टोला लगावला. निवडणुका नाही तर उगाच भिजून का भाषण करायचं? सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म्हणून नदी पात्रातील सभा रद्द केली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते म्हणाले, आवाज... आवाज. यावर राज म्हणाले, आवाज ! हळूहळू येईल. मी अयोध्या दौरा रद्द केला आहे. त्याचे कारण मी आधीच सांगितले आहे. माझ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पायाचे दुखणे वाढले आहे. त्यामुळे मी माझा अयोध्या दौरा स्थगित केला,असे राज यांनी सांगितले.