रत्नागिरी : झी २४ तास आणि झी मराठीने घेतलेल्या संक्रांत क्वीन स्पर्धेत गुहागरच्या मनाली मनोज बावधनकर यांनी बाजी मारली.
गुहागरच्या पोलीस ग्राऊंडवर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ऑडिशनच्या मार्फेत गुहागर तालुक्यातील एकुण १५ जणींची निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेत मनाली मनोज बावधनकर ह्यांनी प्रथम क्रमांक पटकवाल. सुलक्षणा राशीनकर यांनी द्वितीय तर समीक्षा मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकवला.
ही स्पर्धा घेतना महिलांचा कॅटवॉक, ओळख करून देत आपली कला सादर केली या आगळ्या वेगळ्या झालेल्या स्पर्धेला गुहागर तालुक्यातील महिला वर्गांनी भरभरून दाद देखील दिली.
रसिकांसाठी सातत्यांनी दर्जेदार कार्यक्रम झी २४ तास आणि झी मराठी घेवून येत असतात. 'रात्रीस खेळ चाले' आणि 'गाव गाता गजाली' फेम अभिनेता व लेखक प्रल्हाद कुरतडकर तसेच 'अस्मिता' फेम अभिनेत्री मयुरी वाघ यांनी सुत्रसंचालन करून या स्पर्धेत रंगत आणली.
सलग दुस-या वर्षी संक्रांत क्वीन स्पर्धा ही गुहागरमध्ये घेण्यात आली. गुहागरनंतर औरंगाबादमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
गुहागरमध्ये रंगली संक्रांत क्वीन स्पर्धा