अट्टल गुन्हेगाराला अटक, राज्यात ५७ ठिकाणी गुन्हे

राज्यभरात ५७ ठिकाणी विविध गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. सात गुन्ह्यांमध्ये हा आरोपी फरार होता.

Updated: Dec 6, 2018, 10:59 PM IST
अट्टल गुन्हेगाराला अटक, राज्यात ५७ ठिकाणी गुन्हे title=

रत्नागिरी : राज्यभरात ५७ ठिकाणी विविध गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. सात गुन्ह्यांमध्ये हा आरोपी फरार होता. निशांत तथा राहूल प्रविण परमार असे या गुन्हेगाराचं नाव असून तो मुंबई येथील दहिसरचा आहे. त्याच्यावर राज्यभरात पोलीस स्थानकात खंडणी, चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. 

पोलीस असल्याची बतावणी करून त्याने अनेकांना गंडा घातलाय.. रत्नगिरी शहरातील उदयोगपती दीपक गद्रे यांच्याकडे त्याने खंडणीसाठी फोन केला होता. गद्रे यांच्या तक्रारीवरुन रत्नागिरी पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली. 

अधिक माहिती घेतली असता त्याच्यावर मुंबई शहर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, बीड, सिधुंदुर्ग, सोलापूर इत्यादी ठिकाणी अशाच प्रकारचे खंडणी, चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.