मुंबई : राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व जिल्हे लेव्हल 3मध्ये असणार आहे. त्यामुळे कोविड ( COVID-19 pandemic) नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतच खुली राहणार आहेत. तर सामान्यांसाठी लोकल प्रवास करता येणार नाही. त्यामुळे प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Restrictions in Maharashtra again: Unlock rules changed, see what will continue, what will closed?)
कोरोना रूग्णांची वाढती संख्या, डेल्टा प्लसचा वाढता धोका, डेल्टा प्लसमुळे गेलेला पहिला बळी यामुळे राज्य सरकारने पुन्हा राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. आता सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतच खुली राहणार आहेत. दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्रात थोडी सूट मिळत होती, पणडेल्टा प्लसमुळे महाराष्ट्राला पुन्हा सावध व्हावं लागणार आहे आणि नियमांचे कठोर पालन करावंच लागणार आहे.
राज्यात तिसऱ्या लाटेचे संकट गडद झाल्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तसेच तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी काय तयारी करावी लागणार आहे. डेल्टा प्लसने धोका वाढवला आहे. त्यामुळे अनलॉकच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने तातडीनं अनलॉकचे नियम बदललेत. आता राज्यातले सगळेच जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असणार आहेत.
- अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
- इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार
- मॉल्स, थिएटर बंदच राहतील
- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील
- दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल
- लोकल सेवा बंदच राहिल
- सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी
- खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
- चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परावनगी
- लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
- अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार