संदीप नाईक भाजपमध्ये घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती?

Sandeep Naik : नवी मुंबईचे संदीप नाईक घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती आखली जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 26, 2024, 09:34 PM IST
संदीप नाईक भाजपमध्ये  घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती? title=

Navi Mumbai Sandeep Naik : संदीप नाईक यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईक यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या घरवापसीची चर्चा का सुरू झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत वडील गणेश नाईक भाजपमध्ये तर मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असं चित्रं पाहायला मिळालं. बेलापूरमधल्या जोरदार लढाईत भाजपच्या मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांचा पराभव केला. निसटत्या मतांनी मंदा म्हात्रे विजयी झाल्या. राज्यात महायुतीला भरघोस यश मिळालं असून नवं सरकार स्थापन झालंय. आता तुतारी हाती घेतलेल्या संदीप नाईकांना मात्र घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईकांना याबाबत विचारल्यावर, आमच्या कुटुंबात निर्णय स्वतंत्रता असते असं सांगून त्यांनी यातला सस्पेन्स वाढवला. 

भाजपच्या मंदा म्हात्रेंनी संदीप नाईकांचा पराभव करून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. आता संदीप नाईकांना घरवापसीचे वेध लागले आहेत. गणेश नाईकांना मंत्रीपद आणि संदीप नाईकांची घरवापसी झाल्यास नवी मुंबईत नाईकांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे मंदा म्हात्रेंचं भाजपमधलं महत्त्व कमी करण्याचा हा डाव आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं राजकीय वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. निवडणुकीत पराभव झालेल्या संदीप नाईकांना आता पुन्हा घरवापसीचे वेध लागलेत का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं राजकीय वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. निवडणुकीत पराभव झालेल्या संदीप नाईकांना आता पुन्हा घरवापसीचे वेध लागलेत का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी वनमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय. गेल्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवारांनी वनमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. यावेळी नाईकांना ही जबाबदारी देण्यात आलीये.