लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : वयाच्या पाचव्या वर्षीच दत्ता वाघिरे या हुशार विद्यार्थ्याच्या वडिलांचं निधन झालं... त्यानंतर दत्ताची आई दुसऱ्याच्या शेतात राबून तीन मुलांचं शिक्षण पूर्ण करतेय. दहावीच्या परीक्षेत दत्तानं तब्बल ९७ टक्के मिळवलेत.... त्याच्या कष्टांना तुमची साथ हवीय...
बीडमधधल्या उदंड वडगाव शेजारच्या शिवाजीनगर वस्तीत दत्ता राहतो. दत्ताच्या वडिलांचं दहा वर्षांपूर्वी आजारानं निधन झालं.... मुलांनी शिकावं म्हणून दत्ताची आई दुस-याच्या शेतात मोलमजुरी करते. मुलांच्या शिक्षणात खंड पडू द्यायचा नाही, असा आईचा - मनीषा वाघिरे यांचा निर्धार होता... दत्तानंही आईच्या कष्टांचं चीज केलं आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ९७ टक्के मिळवले.
दहावीत मिळालेल्या या यशात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचं दत्ता सांगतो.... त्याला आयएएस अधिकारी व्हायचंय.
दत्ताला दोन बहिणी आहेत.... दत्ता आणि त्याच्या दोन बहिणींचं शिक्षण अजून व्हायचंय. आईच्या फक्त शेतमजुरीमध्ये ते शक्य नाही. त्यामुळे दत्ताला मदतीचा हात द्यायला पुढे या आणि सढळ हस्ते मदत करा...