सातारा पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता

पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होणार

Updated: Jan 14, 2021, 10:52 AM IST
सातारा पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता  title=

सातारा : सातारा पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे. भाजपवासी असलेल्या दोन्ही राजांनी आगामी पालिका निवडणुकीत आपापली धोरणं आणि अजेंड्यांचा आरखडा मांडण्यास सुरुवात केली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनीही सातारा पालिका निवडणूक संपूर्ण ताकद पणाला लावून लढण्याचे जाहीर केले.

दरम्यान ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाच्या इव्हेंटच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसलेंनी सातारा विकास आघाडी' या स्लोगनचा समावेश असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशनही केलं. त्यातून पुढील निवडणुकीची त्यांची घोषणाही स्पष्ट झाली.  तर पक्षाचा झेंडा कायम ठेवण्यासाठी भाजपने आपला वेगळा अंजेडा मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेची आगामी निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.

सातारा पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला अजेंडा मांडण्यास सुरुवात केलीये. सातारा पालिकेची निवडणूकीची चर्चा सुरु झाली आहे. मागच्या निवडणुकीत दोन्ही राजे हे राष्ट्रवादीमध्ये होते. तरी देखील स्वतंत्र आघाड्या तयार झाल्या आणि चुरस वाढली. भाजप सर्व ताकद पणाला लावून निवडणुकीत उतरणार आहे.  भाजपच्या चिन्हावर ६ नगरसेवक निवडूण आले होते. तर नगराध्यक्षपदासाठीही भाजपने चांगली मते मिळवली होती.