अहमदनगर : देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या शेतक-यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केलाय. कर्जमाफीवर फक्त चर्चा न करता शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केलीय.
निवडणुकीपूर्वी दिलेल्या शेतमालाच्या हमीभावाबद्दल सरकारला विसर पडल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. तसंच कांद्याचे भाव थोडेसे वाढले तर त्याची चर्चा होते. कांद्यानं डोळ्यात पाणी आणल्याचं म्हणलं जात पण जेव्हा कांद्याचे भाव पडतात तेव्हा शेतकऱ्यांच्या अश्रूंकडे दुर्लक्ष केलं जातं, असं पवार म्हणाले.
अहमदनगरमध्ये माजी आमदार यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या.