पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी जोरदार झटका बसल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादीचे नेते सुनील घरत यांच्या कन्येचा पराभव झालाय. पनवेलच्या प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून शिवानी सुनील घरत या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या.
उल्लेखनीय म्हणजे, शिवानी घरत या पनवेलमधल्या सर्वात गरीब उमेदवार ठरल्या होत्या. त्यांच्या नावावर सर्वात कमी संपत्ती दाखवण्यात आली होती... म्हणजेच त्या अत्यल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या उमेदवार होत्या. शिवानीच्या नावावर केवळ १२ हजार ५०० रुपयांची संपत्ती होती.