शिवसेनेचे नरेश मस्के ठाण्याचे नवे महापौर तर पल्लवी कदम उपमहापौर

'महाशिवआघाडी'चं ठाण्यात पाहायला मिळाली झलक

Updated: Nov 21, 2019, 01:44 PM IST
शिवसेनेचे नरेश मस्के ठाण्याचे नवे महापौर तर पल्लवी कदम उपमहापौर title=

कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची सेनेकडून निवड झालीय. आज दुपारी ०१.०० नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे ठाणे महापालिकेत दाखल झाले आहेत. तसेच इतर सेना नेतेदेखील उपस्थित झालेत. राज्यात बदलेलं सत्तासमीकरण पाहता ठाण्यात महाआघाडीचा महापौर होईल अशी शक्यता वर्तविली जात होती... शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची विनंती मान्य करत ठाणे मनपामध्ये शिवसेनेविरुद्ध कोणत्याच पक्षाने महापौर व उपमहापौर पदाकरता अर्ज भरलेला नव्हता. त्यामुळेच ठाण्यात खऱ्या अर्थाने महाशिवआघाडीचे दर्शन घडले. 

आज ठाण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सजावट करत पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे.