प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याच्या नैराश्येतून बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचे स्वतःचे जीवन संपवलं आहे. गुरूवारी कुणीही नसल्याचे पाहून तरूणीने फॅनला साडीने गळफास लावून घेतला. गेले पाच-सहा दिवस तरूणी नैराश्यात होती, अशी माहिती पालकांनी दिली.
कोल्हापूर ब्रेकिंग :
ऑनलाइन अभ्यासाच्या तणावातून फार्मसीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या
20 वर्षीय विद्यार्थिनीने फॅनला गळफास घेवुन केली आत्महत्या
कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी इथली दुर्दैवी घटना
करावीर पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंदhttps://t.co/HOK58cBO5u#OnlineExam #Kolhapur pic.twitter.com/ws1OJ4rUD9— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 17, 2020
ऐश्वर्या बाबासो बाटील असं या वीस वर्षीय तरूणीचं नाव आहे. करवीर तालुक्यातील वाशी या गावात राहणारी तरूणी. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या पाटील ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोना संसर्गामुळे सध्या शिकवण्याचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. पण ऑनलाईन शिक्षण तिला जमत नव्हते. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ती अस्वस्थ आणि निराश होती.
याच नैराश्यातून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी तातडीने तरूणीला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.