सून, सासरे, आणि दीर एकाच वेळी बारावी परीक्षेत पास...

ग्रामीण भागातील देहाडे कुटुंबाचं सर्वत्र कौतुक 

Updated: Jun 9, 2022, 06:12 PM IST
सून, सासरे, आणि दीर एकाच वेळी बारावी परीक्षेत पास...  title=
१. ऋतिका (जाधव) देहाडे, सून 2. लक्ष्मण देहाडे, सासरे 3. समीर देहाडे, मुलगा

सोनू भिडे, नाशिक- राज्याचा बारावीचा निकाल बुधवार ८ जून रोजी जाहीर झाला आहे. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी कोकण विभाग प्रथम स्थानी आहे तर उतीर्ण झालेल्यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे. पालकांनी परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच कौतुक केलंय तसच आनंद सुद्धा व्यक्त केला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात एक आगळ्या वेगळ्या निकालाची चर्चा रंगली आहे.
 
४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली. यानंतर प्रतीक्षा होती ती निकालाची. बुधवारी हा निकाल जाहीर झाला. नाशिक जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.३५ टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेला १६०६१० विद्यार्थांनी परीक्षा दिली. या परीक्षेत त्रंबकेश्वर तालुक्यात देहाडे कुटुंबाचा समावेश होता. देहाडे कुटुंबाची सून ऋतिका तिचे सासरे लक्ष्मण, आणि दीर समीर या तिघांनीही बारावीची परीक्षा सोबत दिली आहे. 

देहाडे कुटुंब नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आवटे येथे राहतात. या कुटुंबात एकूण पाच जण आहेत. कुटुंब प्रमुख लक्ष्मजण देहाडे हे दहावी पास आहेत. तर त्यांचा एक मुलगा Bsc ला आहे. तर एक मुलगा बारावीला आहे. त्यांच्या मोठ्या मुलाच काही महिन्यापूर्वी लग्न झाल आहे. त्यांची सून हि दहावी शिकली होती. मात्र सुनेने सुद्धा आपल्या मुलांप्रमाणे उच्च शिक्षण घ्याव अशी कुटुंबाची इच्छा होती. याबरोबर लक्ष्मण यांना सुद्धा अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. 

दहाडे कुटुंबातील तीन सदस्यांनी सोबत परीक्षा दिली. यामध्ये ऋतिका हिने आव्हाटे येथे, सासरे लक्ष्मण यांनी खोडाळा येथे आणि मुलगा समीर याने सामुंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाला असता सून ऋतिका हिला ५० टक्के, सासरे लक्ष्मण यांना ६४.५० टक्के आणि दीर समीर याला ६४ टक्के गुण मिळाले आहेत. या निकालाने देहाडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तर सर्वत्र या कुटुंबाच कौतुक केल जात आहे.