Eknath Shinde On ST Employees : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढत्यात वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employees) महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येतं. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये (Dearness allowance) 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 203 टक्क्यांवरून वाढवून 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात ४ टक्क्यांची वाढ
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज #एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यास मान्यता दिली. यामुळे राज्य शासनावर एकंदर ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. pic.twitter.com/yajJQzjI8e
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 8, 2023
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून वाढवून ३८ टक्के करण्यास आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी - कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. pic.twitter.com/fsRx40JU0S
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 8, 2023
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 90 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केल्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, दीड वर्षांपूर्वी एसटी कामगारांनी एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात संप पुकारला होता. सरकारने मान्य केलेल्या कामगारांच्या मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने एसटी कामगार संघटनेतर्फे 13 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक पुकारली होती. मात्र, त्याआधीच सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे.