मुंबई : राज्यात काल अचनाक आलेल्या वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना आणि बागायती शेतीला बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झालेय. कोकणात आंब्या पिकाला फटका बसलाय. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक ठिकाणी मोठमोठ्या गाराही पडल्यानं नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. कोकणात रत्नागिरी, रायगड जिल्हयात पाऊस झाला. त्यामुळे आंबा, काजू पिकाला याचा फटका बसणार आहे. या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान या अवकाळी पावसामुळे गरमीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, इंदापूर परिसरात वादळासह जोरदार पाऊस झाला. इंदापूर येथे वादळ वाऱ्यात अंगावर झाड कोसळून एक जण जागीच ठार तर एक जखमी झाला. इंदापूर - बारामती राज्य महामार्गांवरिल चोपनफाटा येथे ही घटना घडली.
लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. उदगीर शहर आणि परिसरात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसाने झोडपून काढले. यावेळी विजांच्या कडकडाटासह वादळी वारेही सुटले होते. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. परीसरातील काही झाडेही उन्मळून पडली.तर या पावसाच्या तडाख्याचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. दरम्यान या अवकाळी पावसामुळे गरमीमुळे हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोणावळा शहर तसंच संपूर्ण मावळ परिसराला अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं. यासोबतच अनेक ठिकाणी मोठमोठ्या गाराही पडल्यानं नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मागील दोन दिवसांपासून लोणावळा शहरातील तापमान अचानक मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्यामुळे हैराण झालेल्या लोणावळेकरांना कोसळलेल्या या अचानक पावसानं दिलासा मिळाला.