Sunetra Pawar Post : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भोर वेल्हे मुळशी विधानसभा मतदार संघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी हजेरी लावली होती. सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लढाई असल्याने सुनेत्रा पवार यांनी जोरदार तयारी करण्यास सुरूवात केली आहे. सारोळा इथे घेतलेल्या सदिच्छा भेटीत महायुतीतील सर्वच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली अन् विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर (Baramati LokSabha) देखील निशाणा लगावला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केलेली फेसबूक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
महायुतीतील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विकासकामाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पक्षीय राजकारणा पलिकडचे, व्यापक हिताचे अनुभव सांगितले. जनतेला 24 तास भेटणारे दादा आहेत, कधीही फोन केला तर त्याला प्रतिसाद देणारे दादा आहेत, आपण सारे जण दादांचे भाऊ आहोत, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच. अशा अनेक भावना सर्वांकडून पोटतिडकीने व्यक्त होत होत्या. त्या भावनातून लोकसभा निवडणुकीतील विजयाचा निर्धार व्यक्त केला, अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे. इथं आल्यावर मला माझ्या आजोळची आठवण झाली. त्या अर्थाने आजोळातून मिळणारे प्रेम मला सारोळा येथे मिळणार याची खात्री येथील एकजुटीने मिळाली, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
बारामती मतदार संघातील भोर तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान भोंगवली गावात नागरिकांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीवर पहिल्यांदाचं झाल्या व्यक्त झाल्या. विकासासाठी अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतलीय. अनेक वर्षांपासून पवार साहेब सांगत होते व्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला मिळाल पाहिजे, आपण संविधानाच्या गोष्टी सांगतो.. लोकशाही आहे म्हणतो. मग जर लोकशाही असेलं आणि अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बरोबर असणारी 80 टक्के सोबत आली असतील तर पक्ष चोरला किंवा चोरून नेला असं होऊ शकतं? आपण लोकशाहीच्या गप्पा मारतो मग लोकशाही नक्की कशाला म्हणायचं? असा सवाल सुनेत्रा पवार यांनी विचारला आहे.
दरम्यान, संविधानाने प्रत्येकाला विचार स्वतंत्र्याचा अधिकार दिला आहे..मग अजित पवारांनी त्यांची भूमिका बदलली त्यांचा विचार वेगळा असेलं तर ते चुक कसं असू शकेल? लोकं सुज्ञ आहेत, त्यामुळे नक्की खरं कायं आणि खोट कायं हे लोकांना समजेल, असंही म्हणत सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.