औरंगाबाद : शहरामध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित असल्याचे पुरावे आता पुढे येऊ लागले आहेत. औरंगाबादमध्ये ऑनलाईन शस्त्र मागविण्यात आल्याचे पुढे आलेय. फ्लिपकार्टमार्फत दंगलीआधी तलवारी ,चाकू आणि शस्त्रं मागवण्यात आली होती. पोलीसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी इन्स्टाकार्ट सर्विस प्रायव्हेट लिमिटेड पोलिसांनी छापा घातला. त्यात १२ तलवारी, तेरा चाकू आणि एक कुकरी जप्त केली. खेळणी मागवण्याचा बनाव रचून हत्यारं मागवल्याचंही आता पुढे आलंय.
दंगलीनंतर पोलीस आता सतर्क झालेत. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तलवारी आणि गुप्ती जप्त केल्या आहेत. नागेश्वरवाडीतील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून ही हत्यारं जप्त करण्यात आली आहेत.