ठाणे : ठाण्यातल्या गायमुख परीसरात एका कारमध्ये मृतदेह आढळला आहे.
हा मृतदेह संकेत जाधव या व्यक्तीचा आहे. संकेत जाधव हा ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटदार होता. संकेत हनुमान जाधव या व्यक्तीचा मृतदेह त्याच्याच गाडीत आढळून आला.
संकेत जाधवच्या छातीत गोळी झाडली गेली आहे. घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस तपास करत आहेत.
रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. संकेत जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या तीन ओळीच्या सुसाईट नोटमध्ये पत्नी आणि मुलीची माफी मागितली आहे.
संकेत जाधव यांच्या आत्महत्येमुळे कंत्राटदारांमध्ये आणि महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.