योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : चांदवड तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले पिके खराब होत असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आजमितीस तालुक्यात सरासरीपेक्षा १० ते १२ टक्के पाऊस झाला असून ह्या पावसावर पेरणी केली असल्याने पिके टिकावी ह्यासाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
चांदवड तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण बरेच कमी आहे. तालुक्याच्या सरासरीच्या विचार केला तर ३८७ मिमी पावसाची सरासरी आहे. आजमितीला काही मंडळात १० ते १२ टक्के पाऊस झाला आहे. साधारण २५ ते ३० टक्के पेरणी झालेली असून मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मका, उडीद आदी पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. परंतु पावसाने उघडीप दिल्याने ही पिके खराब होत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच दुष्काळामुळे होरपळलेले शेतकरी पिके जगवण्यासाठी धडपड करीत असून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
गेल्या दोन चार वर्षपासून चांदवड तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थती आहे. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातील दोनदा पाऊस चांगला पडला. त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागतीच्या सुरुवात केली. मशागत केल्या नंतर एक महिना उशिरा पाऊस झाल्यामुळे पहिलेच उशीर झाला होता पेरणीसाठी त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी भुईमूग, मूग, उडीद, टमाटे, वैगेरे लावले आहे. मका टाकली आहे. जेणेकरून पाऊस पडेल आणि बियाणे उगवेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जी पिके पेरली आहे ते पीक उगवेल का नाही या भीतीने शेतकरी सावरला आहे. दुबार पेरणी करायचे शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे.
चांदवड तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण बरेच कमी आजमितीला काही मंडळात १० ते १२ टक्के पाऊस झाला आहे. साधारण २५ ते ३० टक्के पेरणी झालेली असून मका, बाजरी, सोयाबीन ह्या पिकाची लागवड केलेली आहे. परंतु पावसाअभावी पिके खराब होत असल्याने लवकर पुरेसा पाऊस नाही आला. तर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ शकते असे मत तालुका कृषी अधिकारी यांनी व्यक्त केले आहे.
चांदवड तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण बरेच कमी आहे. सुरुवातीला तालुक्याच्या सरासरीच्या विचार केला तर ३८७ मिमी पावसाची सरासरी आहे. आजमितीला काही मंडळात १०ते१२ टक्के पाऊस झाला आहे. साधारण २५ ते ३० टक्के पेरणी झालेली असून मका, बाजरी, सोयाबीन या पिकांची लागवड केलेली आहे.