पुणे : अयोध्येला जाणार होतो ते राम जन्मभूमीला दर्शन देणे हा भाग होताच. पण, त्यावेळी जे मुलायमसिंग सरकार होते. त्यांनी अनेक कारसेवकांना ठार केले होते. ती प्रेते शरयू नदीवर तरंगत होती. मला त्यांचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून अयोध्येला जायचं होते.
पण ज्या दिवशी दौरा जाहीर केला त्यावेळी माहोल उभा केला गेला. जर माझ्यासोबत हजारो मनसैनिक तिकडे आले असते. जर तिथे काय झाले असते. आपलं पोर गेली असती जेलमध्ये. त्यांच्या अंगावर केसेस झाल्या असत्या.
जेलमध्ये त्या पोरांना, पदाधिकाऱ्यांना सडवल गेलं असतं. तो ससेमिरा आला असताना ना तर नुकसान झालं असतं.
प्रमुख पदाधिकारी येणार होते. केसेस लावल्या असत्या. ऐन निवडणुकीत इकडे कुणीच नसतं.
तिकडचा एक खासदार उठतो आणि आव्हान देतो, हे शक्य आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. ते सांगता येणार नाहीत, बोलता येणार नाहीत, माझी ताकद तिकडे सापडली असती आणि ते मला होऊ द्यायचे नव्हते. माझ्यावर टीका होणार असेल तर ते मी सहन करेल पण माझ्या पोरांना अडकू देणार नाही.
निवडणूक काळात आपण सर्वाना तिकडे नोटीस पाठवून जेलमध्ये टाकलं असतं आणि इकडे यांना मोकळं रान मिळालं असतं हे यांचं षडयंत्र होतं. ते वेळीच लक्षात आलं म्हणून हे सगळं टाळलं.