मुंबई : येत्या वीकेंडला कोकणात जायचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कोकणात जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. तीन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागात ड्राय डे असणार आहे. यामुळे वीकेंडला कोकणात जायचा प्लान करत असाल तर विचार करा.
23 जून ते 25 जून या तीन दिवस मुंबईसह कोकणात ड्राय डे असणार आहे. विधान परिषद, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ड्राय डे असणार आहे. 25 जून रोजी महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक आहे. तसेच मुंबईत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 25 जूनला मतदान होणार आहे. तसेच कोकणात देखील पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. तर नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
विधान परिषदेची चार जागांसाठी निवडणूक होत आहे त्याची मुदत 7 जुलै रोजी संपणार आहे. राज्य निवडणूक आयोग प्रमुखांनी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जिल्हाधिकाऱ्यांना मतदानाच्या 48 तास आधी दारुविक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही दारुबंदी लागू असेल.