राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट कायम, पाहा आजची आकडेवारी

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.05 टक्के झाला आहे. 

Updated: Jun 6, 2021, 09:05 PM IST
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट कायम, पाहा आजची आकडेवारी title=

मुंबई : राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे शनिवारपेक्षा कमी रुग्णांची नोंद आज रविवारी झाली आहे. तसेच कोरोना बाधितांपेक्षा आज अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 12 हजार 557 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14 हजार 433 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर आज (6 जून) 233 जणांचा मृत्यू झाला आहे. (Today 6 June 2021 12 thousand 557 corona patients found in Maharashtra)

राज्यात आतापर्यंत एकूण 55 लाख 43 हजार 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.05 टक्के झाला आहे. तर मृत्यूदर 1.72 % एवढा आहे.

राज्यात ताज्या आकडेवारीनुसार 13 लाख 46 हजार 389 व्यक्ती या होम क्वारंटाईन आहेत. तर 6 हजार 426 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर एकूण 1 लाख 85 हजार 527 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत किती रुग्ण?

मुंबईत दिवसभरात 794 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 833 रुग्ण बरे झाले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 6 लाख 78 हजार 278 जणांनी यशस्वीपणे उपचार घेतले आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट हा 95% इतका आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 527 दिवसांवर पोहचला आहे. एकूण 16 हजार 70 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

राज्यात सोमवारपासून अनलॉक

दरम्यान कोरोनाचा ओसरता जोर पाहत सोमवारपासून (7 जून) राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार आहे. यानुसार या जिल्ह्यांमध्ये अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या : 

गर्दी आणि आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना

UNLOCK लेव्हल 3 : मुंबईसह लेव्हल 3 जिल्ह्यात काय खुले काय बंद? पाहा