SHIVSENA DUSSERA MELAVA: दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटाने (Shinde Group) मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता . पण दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटापैकी (Shinde Group) कुणालाच परवानगी न देण्याची भूमिका मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतली होती अखेर अनेक वादविवादानंतर अखेर शिवसेनाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली .
याच सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जुने दिवस शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आणि त्या आठवणी समोर येऊ लागल्या...
३० ऑक्टोबर १९६६ शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा. आणि इथूनच बाळासाहेब आणि मराठी माणूस यांचं अनोखं नातं प्रस्थापित होण्यास सुरवात झाली आणि तेव्हापासून शिवाजी पार्क,शिवसैनिक आणि गर्दी हे जणू समीकरच बनून गेलं होत.
२००५ मधील शिवसेना मेळावा सर्वाना आठवतो का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav thackeray,Raj thackeray)एकाच मंचावर होते. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी २००६ मध्ये भरपूर पाऊस असल्याच्या कारणामुळे दसरा ,मेळावा रद्द करण्यात आला होता.
पहिल्या मेळावायचं बाळासाहेबांनी दिलेलं हटके आंमत्रण
मेळाव्याला सर्व मराठी बांधवाना येण्यासाठी बाळासाहेबांनी वेगळ्या पद्धतीनं आमंत्रण दिल होत.
त्यांनी आमंत्रणात म्हटलं होत ..
''स्वतःच्याच राज्यात स्वतःची चाललेली ससेहोलपट थांबवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या मेळाव्यात जातीने उपस्थित राहिले पाहिजे बिचक्या कण्याच्या माणसांनी या मेळाव्यास येऊच नये ..जय महाराष्ट्र ! आणि अत्यंत मार्मिक असं व्यंगचित्र काढलं होत. ज्यात
लिहिलेलं 'उपऱ्यांचा धुमाकूळ.आपली पीछेहाट या सर्वात बुडणाऱ्या मराठी माणसाला शिवसेनेचा मदतीचा हात. ' आणि या एका व्यंगचित्राने आणि बाळासाहेबांच्या लेखणीतून पेपरवर छापलेल्या आशयामुळे अशी काही जादू मराठी माणसांवर केली की शिवाजी पार्कमध्ये तब्बल चार लाख मराठी माणसांनी गर्दी केली होती आणि तो दिवस होता 30 ऑक्टोबर 1966 मधील विजयादशमीचा..
शिवाजी पार्ककडे(shivaji park,dadar) जाणारा प्रत्येक रस्त्यावर गर्दीच गर्दी दिसत होती. शिवसेनेच्या स्थापनेनंतर सीमोल्लंघनाचा दिवशी सर्व मराठी जनता बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र जमली होती. सभेची वेळ जवळ येताच अनेक मराठी माणसं शिवाजी पार्कवर गर्दी करत होते,इतकंच काय शिवाजी पार्ककडे जाणारा प्रत्येक रास्ता गर्दीने तुडुंब भरला होता
आणि मग सायंकाळी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन केले(chatrapati shivaji maharaj) आणि सभेला सुरवात झाली .
प्रबोधनकार ठाकरे यांनी भाषणास(speech) सुरवात केली आणि आपल्या खास ठाकरी शैलीत विरोधकांचा असा काही समाचार घेतला कि सर्व मराठी बांधवांच्या रोमारोमात ऊर्जा संचार होऊ लागली. प्रबोधनकार म्हणाले,
''अरे सामोपचाराच्या गोष्टी गा@#नि कराव्यात ,मर्दाचं हे काम न्हवे महाराष्ट्र काय लेचापेचांचा देश नाही ही वाघांची औलाद आहे आणि या वाघाला कोणी डिवचलं तर काय परिणाम होईल याचे दाखले इतिहास देतो आणि हेच भविष्यकाळात पाहायला मिळतील ''
काय म्हणाले होते बाळासाहेब पहिल्या भाषणात (dasara melava first speech of balasaheb)
''हे काय दृश्य आहे जो आज सभेला आला नसेल तो दुर्दैवीच, वाटत महाराज इथे असते तर त्यांचा घोडा सुद्धा उधळला असता'', पुढे बाळासाहेब म्हणतात,''खरतर आज शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होत पण काही कारणास्तव ते नाही होतेय ,महाराजांना हि असं वाटलं असेल
कि काय उपयोग आहे काय उपयोग आहे येऊन इथे जिथे मराठी माणूस भेकड नेभळट नामर्द झालेला आहे ,इथे पार्कमध्ये परप्रांतीय फिरताहेत,खाणारे पण उपरेच आणि महाराजांनी ठरवलं असत प्रथम हा शिवसेनेचा मेळावा पाहतो ,मराठी माणूस जिवंत आहे का बघतो नाहीतर 13 किंवा ६6 ला येतो ..''
अशी झाली सांगता
बाळासाहेबांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये एक वेगळीच जादू झाली भाषण संपताच एकच आवाज अख्ख्या शिवाजी पार्कवर दुमदुमू लागला आणि तो म्हणजे ''हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ''.....
पाहा बाळासाहेबांची गाजलेली भाषणं(famous speech of balasaheb thackeray)