कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण, पथकावर दगडफेक

कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला आज हिंसक वळण लागलं. इथल्या गोकुळनगरमध्ये अनधिकृत झोपड्या उठवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावानं दगडफेक केली. 

Updated: Mar 15, 2018, 11:18 PM IST
कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण, पथकावर  दगडफेक title=

पुणे : कात्रजमध्ये अतिक्रमण कारवाईला आज हिंसक वळण लागलं. इथल्या गोकुळनगरमध्ये अनधिकृत झोपड्या उठवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावानं दगडफेक केली. 

तसंच त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या जागेवर महापालिकेला पाण्याची टाकी बांधायची आहे. मात्र त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोपड्या झाल्या आहेत. त्या हटवण्यासाठी गेलेले जेसीबी तसंच अग्निशामक दलाच्या गाडीचं संतप्त जमावानं नुकसान केलं. 

या दरम्यान ३ ते ४ जणांना किरकोळ दुखापत झालीय. या घटनेनंतर तिथं मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. पोलिस बंदोबस्तातच अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आलीय. दरम्यान दगडफेक करणार्यां १५ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.