दीपक भातुसे, मुंबई : राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे शनिवारी आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. राज्यात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने काही कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आवश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतर दुकाने बंद राहणार आहेत.
पण याचा दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. शनिवारी कडक लॉकडाऊन असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात थोडासा बदल होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे शनिवारी होणारे पेपर पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर ही बैठक होत आहे.
राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाला आहे. त्यामुळे शनिवारी होणार्या पेपर संदर्भात चर्चा होणार आहे.
शनिवारी होणारे पेपर पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात थोडासा बदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.