मुंबई : लोकलमध्ये सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांना जसा गर्दीचा त्रास सहन करावा तशा तक्रारी ‘फर्स्ट क्लास’ मधून प्रवास करणाऱ्यांकडूनही वारंवार येत होत्या.
या तक्रारींची आता दखल घेण्यात आली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी ट्वीट करुन फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना आनंदाची बातमी दिली आहे.
मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दिवसागणिक वाढतच चालली आहे. लोकल ट्रेनमध्ये सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास असे दोन प्रकार आहे. यातील फर्स्ट क्लास हा दिवसेंदिवस वर्स्टक्लास बनत चालल्याची प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सेकंड क्लासपेक्षा जास्त पैसे आकारुन किमान बसण्यापुरती व्यवस्थित जागा मिळण्याची अपेक्षा त्यांना असते. पण सकाळी आणि संध्याकाळी कामाच्या वेळेत या डब्ब्यातही गर्दी असल्याचे पाहायला मिळते. या बाबतच्या प्रवाशांनी वारंवार तक्रारी पश्चिम रेल्वेकडे आल्या होत्या. त्यामुळे केल्याने फर्स्ट क्लासचे डबे वाढवण्याबाबत प्रशासन विचार करीत आहे.
‘पश्चिम मार्गावर धावणाऱ्या १५ डब्यांच्या लोकलमध्ये आणखी एक डबा ‘फर्स्ट क्लास’साठी देण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले.
सेकंड क्लासच्या तुलनेत फर्स्ट क्लासचं तिकीटची किंमत जास्त असते. फर्स्ट क्लासची क्षमता वाढवली तर जास्त प्रवासी याने प्रवास करू शकतील आणि त्यातून रेल्वेला जास्त फायदा होऊ शकेल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
महिलांसाठी विशेष लोकल आणि संपूर्ण एसी लोकल चालवण्यात येत असेल तर फक्त ‘फर्स्ट क्लास’चे डबे असणारी लोकल का सुरू नाही? असा प्रश्नही फर्स्ट क्लास प्रवाशांकडून वारंवार विचारण्यात येतो.