मुंबई : राज्याच्या राजकाणारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची आज अचानक घोषणा केली. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्य आज 'लोक माझे सांगाती' (Lok Mazhe Sangati) या शरद पवारांच्या आत्मचरित्रचा प्रकाशन सोहळा होता. प्रकारशन सोहळ्यात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. पक्षाच्या वरिष्ठांनी नव्या अध्यक्षांसंबंधी निर्णय घ्यावा असंही शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. (Sharad Pawar steps down as NCP president)
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शरद पवारांनी निवृत्तीचा आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. पवारांच्या निर्णयाने उपस्थितितांच्या डोळ्यात अश्रु तरळले. यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्षात असणारच आहे, फक्त पदावर असणार नाही एवढंच म्हटलंय, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा करतानाच शरद पवार यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समिती गळीत करावी अशी विनंती केली. याचबरोबर त्यांनी या समितीत कोणते सदस्य असतील याची संभाव्य नावही त्यांनी जाहीर केली. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड करेल.
समितीतील संभाव्य नाव
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा या समितीत समावेश असेल.
शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
"महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने 56 वर्षं मला सत्तेच्या राजकारणात ठेवलं. अजूनही माझी राज्यसभेची तीन वर्षं बाकी आहेत. इतकी संधी आजपर्यंत कोणालाही मिळालेली नाही. इतकी वर्षं सतत लोकसभा, राज्यसभेत असणारी व्यक्ती मला पाहायला मिळालेली नाही. करुणानिधी हे एकमेव आहेत, ज्यांचा इतका मोठा कालखंड होता. अडवाणी, वाजपेयी यांना पराभव पाहावा लागला होता. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी पराभल दाखवला नाही. 63 वर्षांपासून माझा प्रवास सुरु असून यातील 56 वर्ष सत्तेत आहे," असं शरद पवारांनी सांगितलं.