Kalyan Taloja Metro 12 : कल्याणमधील तळोजा मेट्रो रेल्वे प्रकल्पाला सुरुवात झाली. कोळेगावात नवीन पलावा रस्त्यावर मेट्रो रेल्वेची पायाभरणी केली.3 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आठवडाभरात या कामाला सुरुवात झाली आहे. नियोजीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
कल्याण-तळोजा मेट्रो-12च्या प्रकल्पाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 3 मार्च 2024 रोजी भूमीपूजन झाले. 20 किलोमीटरच्या या मार्गावर 19 स्टेशन असणार आहेत. ऑक्टोबर 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यासाठी 5865 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कल्याण, भिवंडी, ठाणे या मेट्रो मार्गाचं एकत्रीकरण होणार आहे .कल्याण-डोंबिवली आणि आजूबाजूच्या 27 गावांना मोठा फायदा होणार आहेय
मुंबई महानगर प्रदेशात होणारी लोकसंख्या वाढ, विकास व रोजगार वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आवश्यक असणारे परिवहन जाळे यांचा पूर्णपणे अभ्यास करुन सर्वंकष परिवहन अभ्यास सन 2008 मध्ये पूर्ण केला. तसेच कल्याण-डोंबिवली या शहरातील वाढती लोकसंख्या व आजूबाजूचा होणारा विकास, 27 गावांचा विकास आराखडा, कल्याण विकास केंद्र व NAINA चे क्षेत्र तसेच कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबई या शहराला जोडण्याची निकड लक्षात घेता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो मार्ग-5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) हा मेट्रो मार्ग विस्तारित करुन कल्याण ते तळोजा (डोंबिवली मार्गे) प्रस्तावित केला आहे.