वाळू माफियांकडून तहसीलदारावर कुऱ्हाडीने हल्ला

कुऱ्हाडीने वार करून त्यांच्या ताब्यातील वाळूचा टिपर घेऊन पळून गेले.

Updated: Aug 13, 2018, 07:35 PM IST
वाळू माफियांकडून तहसीलदारावर कुऱ्हाडीने हल्ला title=

नगर: सध्या शहरात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरु आहे. जामखेडच्या तहसीलदारावर वाळूमाफियांनी हल्ला केला. जामखेडच्या धानेगाव इथल्या सैरी नदीपात्रात रविवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. वाळू तस्करांनी दगड, लाडकी दांडके आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. यामध्ये तलाठी गंभीर जखमी झाला.

 ही घटना समजताच तहसीलदार कारने घटनास्थळी आले असता वाळू तस्करांनी त्यांची कार अडवून त्यावर दगडफेक करून कुऱ्हाडीने वार करून त्यांच्या ताब्यातील वाळूचा टिपर घेऊन पळून गेले. याबाबत जामखेड पोलिसांत एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केले असून आरोपी फरार आहेत. या घटनेचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.