Maharashtra Politics : राष्ट्रवादीच नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची दोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवार यांच्या स्पष्टीकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू बदलला आहे. त्यातच आता भाजपचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. 2019च्या तुलनेत भाजपच्या दुहेरी आकड्यात जागा घटणार आहेत. विनोद तावडे (Vinod Tawade) समितीने केंद्रीय नेतृत्वाला अहवाल दिला आहे.
लोकसभा निवडणुकीला घेऊन विनोद तावडे समितीचा महाराष्ट्र संदर्भाती अहवाल नकारात्मक आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने वेगात पावले उचलत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस टू राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या जोरावर भाजपचा लोकसभा निवडणुकीत केवळ 22 ते 25 जागाच मिळणार असल्याचा अंदाज तावडे समितीच्या अहवालात व्यक्त करण्यात आला.
या अहवालानंतर भाजपची चिंता वाढली आहे. भाजपने ऑपरेशन लोटस-२ राबवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. 'महाराष्ट्रात 'ऑपरेशन कमला' सोपं नाही, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. भाजपचं दबावतंत्र आहे, पण ऑपरेशन लोटस सोपं नाही. असं त्यांचं म्हणण आहे.
अजित पवारांवरून शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं समोर आले आहे. अजित पवार भाजपसोबत आल्यास सत्तेबाहेर पडण्याचा इशारा काही आमदारांनी दिला. तर, काहींनी स्वागत केले आहे. नरेश म्हस्केंनी मात्र अजित पवार नाराज असून आज ना उद्या महाविकास आघाडीतून बाहरे पडणार असल्याचा दावा केला आहे.
अजित पवार यांचा खुलासा
जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. आपल्याबाबत केवळ गैरसमज पसरवण्यात आला असून आपण ४० आमदारांच्या सह्या घेतल्याच्याही अफवा असल्याचं अजित पवारांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी सामनातल्या अग्रलेखावरून संजय राऊत आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांचेही कान टोचले.