महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी L&T चे चेअरमन एस एन सुब्रह्मण्यम यांच्या '90 तास काम' करण्याच्या मुद्द्यावर टिपणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, कामाच्या तासासोबतच कामाच्या क्वालिटीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आनंद महिंद्रा यांनी भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 या कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केलं आहे. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव असतात. यावेळी त्यांनी 90 तास काम करण्याच्या वक्तव्यावर आपलं मत मांडल आहे. नारायण मूर्ती आणि सुब्रह्मण्यम यांनी काही दिवसांपूर्वी कामाच्या तासांवरुन केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आहे. आनंद महिंद्रा म्हणाले की, कामावर योग्य निर्णय घेण्यासाठी तुमचं मानसिक संतुलन चांगल असणे गरजेचे आहे.
आनंद महिंद्रा यांनी एस एन सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्यावर सगळ्यांच लक्ष वेधलं आहे. कामाच्या तासासोबतच कामाची क्वालिटी देखील तितकीच महत्त्वाची आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, मुळात ही चर्चा चुकीच्या ठिकाणी जात आहे. ही चर्चा कामाच्या क्वांटिटी बद्दल आहे. पण मुळात ही चर्चा कामाच्या क्वालिटी म्हणजे दर्जाबद्दल होणं तितकंच गरजेचं आहे.
on 90hrs work week debate, Anand Mahindra says- Quality of work is important. He further adds, "My wife is wonderful, I love staring at her."
L&T CMD SN Subrahmanyan must listen to him. #AnandMahindra pic.twitter.com/uNPv1c9RjU
— बलिया वाले 2.0 (@balliawalebaba) January 11, 2025
पुढे आनंद महिंद्रा यांनी जोर देत म्हटलं की, तुम्ही 10 तास काम करा पण यामध्ये तुमच्या कामाचं आऊटपुट अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 40 आणि 90 तास काम केलंत पण तुमचं कामं उत्तम दर्जाचं नसेल तर त्याचा काय उपयोग?
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 या कार्यक्रमात आनंद महिंद्रा यांनी सांगितलं की, सोशल मीडियाचा वापर ते बिझनेस टूल प्रमाणे करतात. त्यांनी सांगितलं की, मला कायम विचारलं जातं की, तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता. तर मी त्यांना सांगू इच्छितो की, मी एकटा नाही. माझी पत्नी खूप सुंदर आहे. तिला पाहणं मला आवडतं. मी इथे मित्र बनवायला आलेलो नाही. तर मला सोशल मीडिया एक अद्भुत बिझनेस टूल वाटतं.
यापूर्वी, एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी रविवारसह आठवड्यातून 90 तास काम करावे असे विधान करून वाद निर्माण केला होता. ते म्हणाला होते की, 'घरी बसून तुम्ही काय करता?' तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहू शकता? बायका किती वेळ आपल्या पतीकडे पाहू शकतात? ऑफिसला जा आणि कामाला लागा. सोशल मीडियावर या विधानावरिन बरीच चर्चा झाली. यापूर्वी, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनीही सुब्रमण्यम यांच्याप्रमाणेच दीर्घ कामाच्या तासांचा पुरस्कार केला होता. त्यांनी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचे आवाहन केले होते.