Nhai Will Build A New 30 Km Long Expressway : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अटल सेतुपजवळ नवीन एक्सप्रेस वे बांधत आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळीची बचत होणार आहे. अटल सेतुजवळील हा सुपर हायवे एकाच ठिकाणाहून मुंबई गोवा हायेव, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धीसह महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना जोडणार आहे.
NHAI बांधत असेलला हा द्रुतगती मार्ग जेएनपीटीजवळील पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत जवळपास 30 किमी लांबीचा असेल. 3,700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे टार्गेट NHAI ने ठेवले आहे. त्यामुळे एमटीएचएल (अटल सेतू) ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास अवघ्या 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग अशा अनेक महत्त्वाच्या महामार्गांना हा द्रुतगती मार्ग जोडणार आहे. इतकचं नाही तर भविष्यात होणाऱ्या अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नाशिक महामार्गाशी देखील हा सुपर हा.वे जोडला जाणार आहे. यासह वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेशी देखील हा महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे JNPT बंदर आणि विमानतळ परिसरात मालवाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जेएनपीटी, गोवा, पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ कमी होणार आहे.
या महामार्गाचा पुढे विस्तार होऊन अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि पडघाजवळील नाशिक महामार्ग (मोरबे, कर्जत, शेलू, वाघणी आणि बदलापूर मार्गे) यांना जोडणार आहे. हा दिल्ली-मुंबई कॉरिडॉरच्या वडोदरा-मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचाही भाग आहे. चौकापर्यंतचा प्रारंभिक 30 किमीचा रस्ता अलिबाग-विरार कॉरिडॉरला समांतर रिंग रोड म्हणून काम सपोर्ट करणार आहे. यामुळे पुडे अखंड प्रवास करता येमे शक्य होणार आहे.