Makar Sankranti 2025 Unlucky Zodiac: हिंदू धर्मातील महत्त्वाचा सणापैकी एक सण मकर संक्रांती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांत म्हणजे जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. तेव्हा या सूर्याचा संक्रमणाचा उत्साह देशभरात साजरा करण्यात येतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांपैकी सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. तो एका राशीत एक महिना राहतो. 14 जानेवारी 2025 ला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर एक महिना तो तिथे राहणार आहे. सूर्य संक्रमणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. काहींसाठी मकर संक्रांत ही शुभ ठरणार आहे. तर काही राशींसाठी मकर संक्रांत संकट घेऊन येणार आहे.
14 जानेवारी 2025 ला सूर्य देव सकाळी 8.41 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या राशी बदलामुळे पाच राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे.
ग्रहांचा राजा सूर्य या राशीच्या 10व्या घरात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीशी संबंधित लोकांनी या काळात सतर्क राहणे गरजेचे आहे. रवि संक्रमणाच्या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. मेष राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागणार आहे. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. याशिवाय आरोग्याबाबतही विशेष काळजी घ्या.
या राशीच्या 9व्या घरात सूर्य देवाचे भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक अचडणींचा सामना करावा लागणार आहे. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढणार आहे. तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मतभेद होणार आहे. तुमचा पार्टनर एखाद्या गोष्टीबद्दल नाराज होणार आहे.
या राशीच्या आठव्या घरात सूर्य देवाचे असणार आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होणारा आहे. अनोळखी लोकांपासून सावध राहवे. पैशाची समस्या जाणवणार आहे. कोणालाही कर्ज देऊ नका. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. पैसे उधार घेतल्यास तुम्ही अडचणीत येतील.
या राशीच्या सहाव्या भावात सूर्य देवाचे संक्रमण असणार आहे. अशा परिस्थितीत या काळात पैशाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या काळात तुम्हाला कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहे.
सूर्य चढत्या राशीत म्हणजेच मकर राशीच्या पहिल्या भावात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत रवि संक्रमणाच्या काळात करिअरमध्ये दबाव वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी अडचणी येणार आहेत. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसणार. फालतू खर्च वाढणार आहे. नोकरदार लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. कुटुंबात काही वाद निर्माण होईल. जमिनीशी संबंधित वाद वाढणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)