Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत टेकडीवर उभा तरुण पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणाला लायटरसाठी विचारत आहे. पण यानंतर पुढे जे काही होतं ते पाहिल्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. म्हणजे शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' चित्रपटातील 'एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा केली तर संपूर्ण विश्व ती तुम्हाला मिळावी यासाठी प्रयत्न करतं' हा डायलॉग येथे तंतोतंत खरा ठरला आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला तरुण गोव्यातील एक टेकडीवर सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी त्याने व्हिडीओवर लिहिलं आहे की, 'अशा ठिकाणी लायटर विसरलो आहोत असा विचार करा'. यादरम्यान एक तरुण तिथे काही अंतरावर पॅराग्लायडिंग करत असतो. यानंतर तरुण थेट त्यालाच तुझ्याकडे लायटर आहे का? अशी विचारणा करतो. 'भावा लायटर आहे का?', असं तो विचारत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.
यानंतर पॅराग्लायडिंग करणारा तरुण थेट खालपर्यंत येतो. यावेळी तिथे उपस्थित लोक हसताना आणि त्याला चिअर करताना ऐकू येत आहे. तरुण त्याला लायटर काढून देतो आणि पुन्हा एकदा पॅराग्लायडिंग करत निघून जातो. पण परत जाताना तो तरुणाला आपण परत आल्यानंतर लायटर परत दे असं सांगायला विसरत नाही. व्हिडीओत तो सांगताना ऐकू येत आहे की, 'परत देशील'.
या व्हिडीओला 11 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. तसंच 1.3 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स आणि शेअर मिळाले आहेत. दरम्यान या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'विश्वास बसणार नाही, पण तो परत आला आणि आम्ही लायटर सोपवलं'.
एका युजरने लिहिलं आहे की, "त्याने फेकलंही नाही, थेट त्याच्या हातात दिलं. खरं कौशल्य आणि स्वच्छ मन". तर एकाने ब्लिंकिट दिवसेंदिवस वेडं होत चाललं आहे अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, तो सहज वरुन फेकू शकला असता, पण तो खालपर्यंत आला हे खरं कौशल्य आहे.