भारतातील सर्वात स्वस्त विमा; फक्त 45 पैशांमध्ये 10 लाख रुपयांचे जीवन विमा

आरोग्याचा वाढत्या समस्या आणि दुसरीकडे आजारावरील खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे अनेक विमा कंपनी तुम्हाला जीवन विमा संरक्षण कवच काढण्याचे फायदे सांगतात. आज आम्ही तुम्हाला अशा जीवन विमाबद्दल सांगणार आहोत, जो फक्त 45 पैशांमध्ये तुम्हाला 10 लाखांचं संरक्षण देतो. 

नेहा चौधरी | Updated: Jan 11, 2025, 05:16 PM IST
भारतातील सर्वात स्वस्त विमा; फक्त 45 पैशांमध्ये 10 लाख रुपयांचे जीवन विमा title=

Indias Cheapest Life Insurance: वाढती महागाई आणि त्यात आजारावरील खर्च त्यामुळे आजच्या जगात प्रत्येकाला जीवन विम्याचे महत्त्व कळलंय. आज प्रत्येक कंपन्यांकडून आपल्या कर्मचारी आणि त्यांचा कुटुंबासाठी जीवन विमा काढल जातो. त्याशिवाय अनेक जण ऑफिस विमासह अजून वैयक्तिक विमा काढतात. जेणे करुन वेळे प्रसंगी पैशांची कमी पडू नये. भारतात पूर्वी भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC जीवन विमा मिळत होता. आजही तो प्रसिद्ध आहे. पण हल्ली देशात अनेक खाजगी क्षेत्रातील कंपन्या तुम्हाला वेगवेगळ्या ऑफस देऊन जीवन विमा संरक्षणचं महत्त्व समजवून सांगतात. पण तुम्हाला भारतातील सर्वात स्वस्त विम्याबद्दल माहितीये का? जो विमा फक्त 45 पैशांमध्ये 10 लाखांचं संरक्षण तुम्हाला देतात. 

भारतातील सर्वात स्वस्त विमा कोणता?

आम्ही ज्या विम्याबद्दल बोलतोय, तो इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) देतं. होय, जेव्हा आपण रेल्वेचं तिकीट बूक करतो, तेव्हा आपलाल्या 45 पैशांमध्ये 10 लाखांचे कव्हर दिलं जातं. रेल्वे प्रवाशांना तिकीट आणि खानपान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने प्रवाशांसाठी एक विशेष आणि परवडणारी विमा योजना सुरू केली आहे.

या प्रवाशांना मिळणार या विमा संरक्षणाचा लाभ!

IRCTC नुसार, 10 लाख रुपयांच्या 45 पैशांच्या विमा संरक्षणाचा लाभ फक्त IRCTC द्वारे ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांनाच मिळतो. योजनेअंतर्गत, विमा संरक्षण केवळ कन्फर्म, आरएसी, अंशतः पुष्टी झालेल्या तिकिटांवर मिळत असतो. 5 वर्षांखालील मुलांसाठी ही सुविधा उपलब्ध नसून 5 वर्षे ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना या सुविधेचा लाभ देण्यात येतो. तर ही सुविधा शताब्दी, राजधानी किंवा सुपरफास्ट ट्रेनसह सर्व प्रकारच्या रेल्वे प्रवासासाठी उपलब्ध आहे.

आयआरसीटीसी विमा योजनेअंतर्गत कव्हरेज आणि फायदे

IRCTC विमा योजनेअंतर्गत, रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्यात येते. 

रेल्वे अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. 

आंशिक अपंगत्व असल्यास, 2 लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते. 

रेल्वे अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च देण्यात येतो. 

आकस्मिक मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. 

IRCTC विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

आयआरसीटीसीच्या 45 पैशांच्या विमा योजनेचा लाभ घेणे खूप सोपे असून यासाठी प्रवाशाने आयआरसीटीसी वेबसाइट किंवा ॲपवर तिकीट बुक करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हा पर्याय निवडून प्रवाशाला फक्त 45 पैसे अतिरिक्त रक्कम भरावी लागते, तिकीट बुक होताच विमा पॉलिसी सक्रिय होते.