शाहरुख खानने आलिया भट्टचा 'चामुंडा' चित्रपट का नाकारला? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अमर कौशिक, ज्याने 'स्त्री 2' सारखा सुपरहिट चित्रपट दिला, सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्ट 'चामुंडा' वर काम करत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाहरुख खानला मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती, पण आश्चर्यकारकपणे शाहरुखने ही ऑफर नाकारली आहे. काय असेल याचे कारण, ज्यामुळे या चित्रपटाला शाहरुख खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला? 

Intern | Updated: Jan 11, 2025, 04:23 PM IST
शाहरुख खानने आलिया भट्टचा 'चामुंडा' चित्रपट का नाकारला? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित title=

शाहरुख खानने 'चामुंडा' हा चित्रपट नाकारला आहे. यामागील कारण सगळ्यांनाचं ऐकायचे आहे. शाहरुखच्या यशस्वी करिअरमध्ये त्याला अनेक चित्रपटामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, तो एक नवीन आणि वेगळ्या प्रकारची कामे शोधत आहे. त्याला आधीच अस्तित्वात असलेल्या प्रोजेक्ट्समध्ये सामील होण्यापेक्षा नवीन आणि चांगले चित्रीकरणावर आधारीत कथा पसंत आहेत. शाहरुखने निर्मात्यांना सल्ला दिला की, त्यांनी या प्रोजेक्टसाठी नवे विचार आणि दृष्टिकोन घेऊन यावा. यामुळे चामुंडाच्या निर्मात्यांना शाहरुखसोबतचे काम खांबवावे लागले. 

शाहरुख खानच्या नव्या प्रोजेक्ट्सकडे लक्ष
शाहरुख खान सध्या चामुंडा चित्रपटाच्या नकारानंतर त्याच्या इतर महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा आगामी चित्रपट 'किंग'साठी खूप उत्सुकता आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग मार्च 2025 मध्ये सुरू होणार आहे आणि 2026 मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज होईल. 'किंग'मध्ये शाहरुख खान आपली मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीनवर दिसणार आहेत, ज्यामुळे या चित्रपटाची अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

शाहरुख खानने अनेक प्रकारे आपल्या करिअरमध्ये वेगळे आणि नवे प्रयोग केले आहेत. पठाण (2023) च्या यशानंतर, सिद्धार्थ आनंद आणि शाहरुखची जोडी एक महत्त्वाचा टर्न घेत आहे. जे काहीतरी वेगळं आणि रोमांचक असणार आहे. 'किंग' मध्ये शाहरुखचे नवीन लूक आणि त्याच्या अभिनय क्षेत्रातला अनोखा अंदाज पाहायला मिळेल.

हे ही वाचा:  प्रभासच्या लग्नाचे गुढ: 'बाहुबली'चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?

शाहरुख खानचा प्रचंड चाहता वर्ग
शाहरुखने जवान , ब्रम्हास्त्र आणि दिलवाले यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर, त्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. तो नेहमीचं आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत असतो आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटातील नव्या लूकमुळे चाहत्यांच्या मनात घर केले आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी त्याच्या अभिनयाच्या फॉर्ममध्ये मोठी बदलाची आशा असते. 'चामुंडा' मध्ये शाहरुख असता, तर नक्कीच हा चित्रपट एक नवीन प्रस्थान घेऊन आला असता, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. चामुंडा ही एक हॉरर-थ्रिलर फिल्म आहे आणि आलिया भट्ट नवा लूक सादर करण्याची असंख्य शक्यता आहेत.

शाहरुखचा 'चामुंडा' प्रोजेक्टसाठी नकार दिला हा एक धक्का असला तरी, त्याच्या नवीन प्रोजेक्ट्समध्ये तयार होणारा अंदाज निश्चितच त्याच्या चाहत्यांना आणखी रोमांचित करेल.