Anant Radhika Wedding : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी या त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात व्यस्त झाल्या आहेत. अनंत अंबानी आणि त्यांची लहानपणीची मैत्रीण राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधी विविध सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. या लग्नाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे. लग्नाआधीच अंबानी कुटुंबाची भावी सून असलेल्या राधिका मर्चंट यांना लाखो नाही तर कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी जामनगरमध्ये त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नापूर्वीचे सेलिब्रेशन सुरू केले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील एक हजार पाहुणे जमणार असल्याचे म्हटलं जात आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन तीन दिवस चालणार आहे. मात्र त्याआधी राधिका मर्चंट यांना त्यांचे भावी सासू सासरे नीता आणि मुकेश अंबानी यांच्याकडून बऱ्याच महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.
याआधी नीता आणि मुकेश अंबानी यांनी त्यांची सून श्लोका मेहता यांना 451 कोटी रुपयांचा मौवाद ल'इनकॉम्परेबल नेकलेस भेट दिला होता. त्यानंतरही महागड्या भेटवस्तू देण्याची परंपरा अंबानी कुटुबियांनी सुरू ठेवली आहे. अंबानी कुटुंबियांनी त्यांची भावी सून राधिका मर्चंट यांनाही अशाच महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
राधिका मर्चंट यांना त्यांच्या सासूबाई नीता अंबानी यांच्याकडून चांदीच्या सुंदर लक्ष्मी-गणेश भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंमध्ये दोन चांदीची तुळशीची भांडी, चांदीचा अगरबत्ती स्टँड आणि लक्ष्मी-गणेश मूर्तींचा सेट आहे. पांढऱ्या फुलांनी आणि इतर सजावटीच्या वस्तूंनी हा हॅम्पर सजवण्यात आला होता.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना मुकेश अंबानी यांनी 4.5 कोटी रुपयांची आलिशान बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड कार भेट दिली आहे. विराट कोहली, आमिर खान, अभिषेक बच्चन आणि इतर काही प्रसिद्ध सेलिब्रिटींकडे ही अत्यंत महागडी ब्रिटिश कार आहे. या लक्झरी कारमध्ये ट्विन-टर्बोचार्ज केलेले 6.0-लिटर W12 इंजिन आहे आणि ती केवळ 3.6 सेकंदात 0-60 mph वेगाने पुढे जाऊ शकते.
नीता अंबानींप्रमाणेच राधिका मर्चंटही प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे. 2022 मध्ये, अंबानी कुटुंबियांनी राधिका मर्चंट यांच्यासाठी द ग्रँड थिएटर, जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे ऑरेंजथेरम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राधिका यांनी गुरू भावना ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. या सोहळ्याला रणवीर सिंग, सलमान खान आणि आमिर खान यांसारख्या मनोरंजन जगतातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती.