युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात दाखल!

आज भारताची सर्वात शक्तिशाली युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात सामील झाली आहे. 

Updated: Nov 21, 2021, 12:14 PM IST
युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात दाखल! title=

मुंबई : आज भारताची सर्वात शक्तिशाली युद्धनौका INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात सामील झाली आहे. आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आधुनिक गरजा लक्षात घेऊन ही युद्धनौका युद्धासाठी तयार करण्यात आली आहे.

75 टक्के स्वदेशी आहे INS विशाखापट्टणम

INS विशाखापट्टणमची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकयार्ड याठिकाणी करण्यात आली. या युद्धनौकेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्माण केली आहे. येत्या काही वर्षांत या क्लासच्या आणखी तीन युद्धनौका 35,000 कोटी रुपये खर्चून बांधल्या जातील.

भारतात बांधलेली सर्वात लांब युद्धनौका

INS विशाखापट्टणम 163 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद आहे. याचं वजन 7,400 टन आहे. ही युद्धनौका अतिशय आधुनिक आहे. ही भारतातील सर्वात लांब युद्धनौका आहे, ज्यावर 50 अधिकाऱ्यांसह सुमारे 300 नाविक तैनात केले जाऊ शकतात.

अनेक वर्षे विविध चाचण्या पार केल्यानंतर, आयएनएस विशाखापट्टणम आता नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रं तैनात करण्यात आली आहेत. आयएनएस विशाखापट्टणमवर स्वदेशी बनावटीची एँटी शिप ब्रह्मोस मिसाइल तैनात करण्यात आले आहे. त्यावर तैनात केलेले क्षेपणास्त्र 70 किमी अंतरावरून हवेत उडणारं शत्रूचं लढाऊ विमान नष्ट करू शकतं.

INS विशाखापट्टणम अणु, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांनाच उत्तर देऊ शकते तर, समुद्रात एक किलोमीटर खोलीवर पाणबुड्यांमध्ये लपलेल्या शत्रूंनाही शोधू शकते. हिंदी महासागर क्षेत्रातील बदलती परिस्थिती पाहता आयएनएस विशाखापट्टणमच्या आगमनाने नौदलाला बळकटी मिळेल. तसेच हिंदी महासागरात भारतीय नौदलाचा सामर्थ्य आणखी वाढणार आहे