मुंबई : भारतात अनेक ठिकाणी डासांचा त्रास आहे, यामुळे झोपमोड होते, तर कधी कधी झोप लागणे अवघड होवून बसतं. मच्छरांना मारण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात आहेत. काही जण डासांना मारण्यासाठी जाळी वापरतात, तर काही जण अनेक वेगवेगळ्या लिक्विडेटरचा वापर करतात. काही प्रॉडक्टचे साईड इफेक्ट असल्याचंही सांगण्यात येतं.
पण बाजारात आता डास मारण्यासाठी खास एलईडी लॅम्प आलेले आहेत, जो लॅम्प लाईट सोर्सच्या माध्यमातून मच्छरांना आकर्षित करतो, हे डास-मच्छर या लॅम्पला जावून चिटकतात.
एलईडी मॉस्किटो किलर डासांना संपवण्याची एक सोपी पद्धत आहे. डासांना मारणारा हा लॅम्प अतिशय छोटा बनवण्यात आला आहे. हा कमी आवाजात डासांना मारतो. जर तुम्हाला डासांचा त्रास आहे, तर हा लॅम्प तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो.
हा 360 डिग्री मॉस्किटो किलर आहे, ज्यासोबत एक दमदार बॅटरी दिली जाते. हा डिव्हाइस 8 तास पावर देत राहतो, आणि डासांना संपवतो. यासोबत एक यूएसबी टाइप-ए पोर्ट किंवा पावर बँक सारखं चार्ज करता येतं, फ्लिपकार्टवरुन 699 रुपयात हा लॅम्प खरेदी करता येतो.
डास मारणारा एलईडी लॅम्प(LED lamp) ट्रिपल एंटी-एस्केप डिजाइन आहे, जो डासांना आकर्षित करतो. नंतर डासाला funnel-shaped design मध्ये फसवून मारतो. सर्व डास खालील ट्रे मध्ये जमा होतात. याचा वापर करणे फार सोपे आहे. फक्त प्लग ऑन करुन सोडून द्या, काही मिनिटात डासांना संपवण्याचं काम सुरु होईल, ऑनलाईन खरेदी करताना संपूर्ण माहिती वाचून आणि खात्री करुनच खरेदी करा.