Political News : भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) समारोप प्रसंगी मुंबईतील (Mumbai News) शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये अनेक नेतेमंडळीची उपस्थिती पाहायला मिळाली. या सभेदरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांनी 'अबकी बार भाजप तडीपार' असा नारा दिला आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणााधी उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून भाषण करत मोठ्या संख्येनं सभेसाठी हजर असणाऱ्या समर्थकांन संबोधित केलं.
उद्धव ठाकरे यांच्या या भाषानंतर तिथं समर्थकांनी जल्लोष केला असतानाच तिथं विरोधकांनी मात्र उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर उपरोधिक टीका करत काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी 'उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल म्हणजे काँग्रेसच्या हाती दिलेलं बाहुलं...ट असं म्हणत त्यांनी ठाकरे गटासह इंडिया आघाडीवर प्रहार केला.
'आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन... आपल्याला हवे तेवढे... शिवतीर्थावर भाषण करणारे..' अशी सुरुवात करत शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर काही प्रश्न उपस्थित केले.
श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला ?, भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का ?, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल "मर्दा"सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? असेच ते प्रश्न.
आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन... आपल्याला हवे तेवढे... शिवतीर्थावर भाषण करणारे..
श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला ?
भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का?
भाषणाची सुरुवात
“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”…— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) March 18, 2024
इतक्यावरच न थांबता हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने "हिंदुत्वाला केले तडीपार" हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच "शिवतीर्थावर" सभा घेण्यात आली होती का? हा प्रश्नही त्यांनी उपस्थि, केला.
काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची "मशाल"
आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा..
अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!! या शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या टीकेवर आता खुद्द उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.